Ration Card Apply Online 2023

Ration Card Online 2023 | नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड ऑनलाइन कसे काढायचे याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.यामुळे  सर्वांचा सरकारी कार्यालयात जाण्याचा त्रास  वाचणार आहे .बऱ्याच वेळा सामान्य नागरिकांना खासगी एजंटला जादा  पैसे देवून काम करून घ्यावे लागते शिवाय मिळेल की नाही याची खात्री पण नसते .आता सरकारने सर्वसमान्यांसाठी मोफत रेशनकार्ड काढण्याची ऑनलाइन व्यवस्था केली आहे.

 राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे.बऱ्याच ठिकाणी रेशन कार्ड काढण्यासाठी खासगी एजंटनी स्वतःची  दुकाने काढली आहे .त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे.याच सर्व गोष्टींना आला घालण्यासाठी सरकारने  ही ऑनलाइन व्यवस्था आणली आहे.

 

Ration Card Apply Online 2023

रेशनकार्डसाठी नागरिकांना वीस रुपये शुल्क भरावे लागत होते.आता शिधापत्रिका मोफत मिळणार असून तेही ऑनलाइन. अंत्योदय अन्न योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली
अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची प्राधान्य कुटुंब योजना तसेच, ऑनलाइन सेवेद्वारे
राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-रेशन कार्ड सुविधा मोफत दिली जाईल. 'Ration Card Online Maharashtra 2023'

 ऑनलाइन रेशनकार्ड काढण्यासाठी http:// remc.mahafood.gov.in या साइड वर जाउन्न आपली करावे लागेल ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडून संकलित केली जाईल. त्यानंतर, अर्जदाराचा नेमका प्रकार त्याच्या शिधापत्रिका मिळण्यासाठी किती दिवस लागतील हे निश्चित होईल. अर्जदार अंत्योदय योजना किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असल्यास, शिधावाटप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच त्याच्या कुटुंबाचे सर्वेक्षण करावे लागेल. त्यामुळे शिधापत्रिका देताना पूर्वीचा २० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे Ration Card Apply Online 2023

 

ज्याला पांढरे रेशनकार्ड काढायचे असेल त्याला सात दिवस लागतील. शिधापत्रिका फायनल झाल्यानंतर तो ऑनलाइन डाउनलोड करू शकणार आहे. त्याला कोणत्या दुकानात रेशन मिळाले याचाही उल्लेख असेल. रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र 2023