Atal Pension Yojana । अटल पेन्शन योजना 2023 :नमस्कार मित्रांनो, आज आपण अटल पेन्शन योजनेविषयी माहिती घेणार आहोत. या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा .या योजनेचे कोणते कोणते लाभ आहेत आणि कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Atal Pension Yojana in Marathi
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारने 1 जून 2015 रोजी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयातील लोक या योजनेत सहभागी होवू शकतात, या योजनेत सहभागी झाल्यानंतर तुम्हाला 60 वर्षे वयापर्यंत हप्ता भरावा लागेल.
जर 60 वर्षांनंतर तुम्हाला दर महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला हप्ता भरावा लागेल . तुम्हाला पेन्शनची रक्कम किती असेल हे तुम्ही मासिक किती हप्ता भरतात यावर अवलंबून असेल. जर तुमची योजना कमी हप्त्याची असेल तर तुम्हाला पेन्शनची रक्कम कमी मिळेल आणि जर तुमची योजना जास्त हप्त्याची असेल तर तुम्हाला जास्त पेन्शन मिळेल
Eligibility for Atal Pension Yojana Registration 2023
अटल पेन्शन योजनेत नोंदणीसाठी पात्रता : अटल पेन्शन योजने साठी प्रवेशाचे वय १८ ते ४० वर्षे
आहे. या वयोमर्यादेत येणारे कोणताही भारतीय नागरिक यासाठी पात्र ठरतो. योजनेची
परिपक्वता ही ६० वर्षे पूर्ण झाल्यावर होते
. तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर
तुम्हाला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल. वय कमी असल्यास
प्रीमियमची रक्कमही कमी असते. आणि जसजसे वय वाढते तसतसे प्रीमियमची रक्कमही वाढते.
जेव्हा
आपण निवृत्ती वेतनाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात सरकारी कर्मचारी किंवा खाजगी क्षेत्रातील
कर्मचाऱ्यांचे नाव येते . मात्र ही योजना केंद्र सरकारने ज्यांना पेन्शन नाही त्यांच्यासाठी
सुरू केली आहे .आता कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ न मिळालेल्या
प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला अटल पेन्शन
योजनेची सदस्यता बँक किंवा विमा कंपनीमार्फत घ्यावी लागेल. अटल पेन्शनशी संबंधित
सर्व मुख्य मुद्दे खाली दिले आहेत.
- ही योजना केंद्र सरकारने 2015
मध्ये ही योजना सुरू केली
होती. या योजनेसाठी, तुमचे वय
१८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्ही सहभागी होवू शकता.
- या योजनेंतर्गत तुम्हाला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर १०००, २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपये पेन्शन दिले जाते. (तुमच्या योजनेनुसार.) पेन्शनची रक्कम तुम्ही घेतलेल्या हप्त्यावर अवलंबून असते.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18
ते 40
वर्षे दरम्यान असावे.
वयानुसार, तुम्हाला
किमान 20 वर्षे
आणि कमाल 42 वर्षे
प्रीमियम भरावा लागेल. (समजा , जर एखादा व्यक्ती वयाच्या 18
व्या वर्षी योजनेत सहभागी झाला
असेल तर त्याला 42 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि जर एखादा व्यक्ति
40 व्या
वर्षी योजनेत सहभागी झाला असेल तर त्याला फक्त 20 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
- एकदा योजना सुरू केल्यानंतर, तुम्ही ते मध्यभागी कधीही थांबवू शकता. यासाठी
तुम्हाला Atal Pension Yojana closer फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी
तुमच्या बँक खात्यात पैसे येतात.
- लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, जमा केलेली रक्कम वारसाला (नामांकित) दिली जाते.
- याचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
तुमचा मासिक प्रीमियम फक्त बँक खात्यातून जमा केला जातो.
- आम्ही प्रीमियम रकमेचा वयानुसार चार्ट खाली दिला आहे.
अटल पेन्शन योजना 2023 ची प्रीमियम रक्कम
APY ची हप्त्याची रक्कम व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते, त्याचे वय किती आहे, वय कमी असल्यास हप्त्याची रक्कम कमी असते आणि वय जास्त असल्यास हप्त्याची देखील अधिक होतो. असे असते कारण वयाच्या ६० वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्तीचा प्रीमियम कमी केला जातो. जर प्रवेशाचे वय 18 वर्षे असेल, तर 42 वर्षांपर्यंत हप्ता कापला जाईल आणि जर तुमचे प्रवेश वय 40 वर्षे असेल, तर हप्ता 20 वर्षांपर्यंतच कापला जाईल. हेच कारण आहे की त्याचा हप्ता वयानुसार बदलतो.
पेंशन योजने मध्ये दाखल होण्याचे वय |
योगदान वर्ष |
मासिक पेंशन रक्कम 1000/- |
मासिक पेंशन रक्कम 2000/- |
मासिक पेंशन रक्कम 3000/- |
मासिक पेंशन रक्कम 4000/- |
मासिक पेंशन रक्कम 5000/- |
18 |
42 |
42 |
84 |
126 |
168 |
210 |
19 |
41 |
46 |
92 |
138 |
184 |
230 |
20 |
40 |
50 |
100 |
150 |
198 |
248 |
21 |
39 |
54 |
108 |
162 |
215 |
269 |
22 |
38 |
59 |
117 |
177 |
234 |
292 |
23 |
37 |
64 |
127 |
192 |
254 |
318 |
24 |
36 |
70 |
139 |
208 |
277 |
346 |
25 |
35 |
76 |
151 |
226 |
301 |
376 |
26 |
34 |
82 |
164 |
246 |
327 |
409 |
27 |
33 |
90 |
178 |
268 |
356 |
446 |
28 |
32 |
97 |
194 |
292 |
388 |
485 |
29 |
31 |
106 |
212 |
318 |
423 |
529 |
30 |
30 |
116 |
231 |
347 |
462 |
577 |
31 |
29 |
126 |
252 |
379 |
504 |
630 |
32 |
28 |
138 |
276 |
414 |
551 |
689 |
33 |
27 |
151 |
302 |
453 |
602 |
752 |
34 |
26 |
165 |
330 |
495 |
659 |
824 |
35 |
25 |
181 |
362 |
543 |
722 |
902 |
36 |
24 |
198 |
396 |
594 |
792 |
990 |
37 |
23 |
218 |
436 |
654 |
870 |
1087 |
38 |
22 |
240 |
480 |
720 |
957 |
1196 |
39 |
21 |
264 |
528 |
792 |
1054 |
1318 |
40 |
20 |
291 |
582 |
873 |
1164 |
1454 |
एकूण जमा रक्कम |
|
1,70,000/- |
3,40,000/- |
5,10,000/- |
6,80,000/- |
8,50,000/- |
How to Upgrade and Downgrade Atal Pension Yojana Premium Amount
हप्त्याची रक्कम कशी कमी किंवा जास्त करावी : जर
तुम्ही अटल पेन्शन योजनेत नोंदणी केली असेल, तर सुरुवातीला तुम्ही 1000 ते 2000 मासिक
पेन्शनची निवड केली होती, पण आता
तुम्हाला ती बदलायची आहे. तुला आता वाटतं की मी ते वाढवायला हवं. तुम्हाला असे
वाटते की पेन्शन योजना 4000 ते 5000 मासिक पेन्शन असावी. त्याची तरतूद apy योजनेत करण्यात आली आहे. तुम्ही हे वर्षातून एकदा करू
शकता.
अटल पेन्शन योजना कशी बंद करावी
How to Close Atal Pension Yojana account : मॅच्युरिटी कालावधीपूर्वी APY मधून पैसे काढण्याची काही कारणे असू शकतात. हप्त्याची
रक्कम परवडत नसेल किंवा कुटुंबातील आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील तर तुम्ही Atal Pension Yojana बंद करू
शकतात.
जर तुम्हाला ६० वर्षापूर्वी त्यातून बाहेर पडायचे
असेल, तर पूर्णपणे भरलेला खाते
बंद करण्याचा फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून नोंदणी केली
आहे त्या बँकेच्या शाखेत द्यावी लागतील.
Atal
Pension Yojana Claim 2023
- मृत्यूनंतर पैसे काढणे (६० वर्षापूर्वी) –
मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीची बँकेत नोंदणी केली जाते. रीतसर भरलेला Atal
Pension Yojana Closer फॉर्म आणि मृत्यू प्रमाणपत्र बँकेला त्या बँकेच्या
शाखेत जमा करावे लागेल. याशिवाय इतर आवश्यक औपचारिकता बँकेकडून पूर्ण केल्या
जातील.
- मृत्यूनंतर पैसे काढणे (६० नंतर) – जर एजंटचा मृत्यू
६० वर्षांनंतर झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जोडीदाराला पेन्शन दिली
जाईल. परंतु जर पती/पत्नीचाही मृत्यू झाला, तर आवश्यक औपचारिकतेनंतर घोषित नॉमिनीला पैसे दिले
जातील.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका. आणि कमेंट मध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती लिहू नये .आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देवू शकत नाही .